Home महाराष्ट्र महात्मा फुले जयंतीनिमित्त शेगावात भव्य शोभायात्रा

महात्मा फुले जयंतीनिमित्त शेगावात भव्य शोभायात्रा

10
0

शेगाव : क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या १९९ व्या जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त महात्मा फुले विद्यालयाच्या वतीने शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली.
शोभायात्रेत क्रांतिसूर्य महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीआई फुले ,छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे वेगवेगळ्या चित्ररथावर आरूढ केले गेले. सर्वप्रथम चित्ररथातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्याचे पूजन महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक उपस्थिती व महात्मा फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल चिंचोळकर, महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या नावकार मॅडम यशवंत विद्या मंदिराचे मुख्याध्यापक लाड सर व विद्यालाचे पर्यवेक्षक शशिकांत घाटोळ यांची देखील उपस्थिती लाभली
त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष संजय कलोरे व शेगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मोहम्मद सलीम यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शोभायात्रेला सुरुवात झाली. शोभायात्रेचा मार्गक्रमण शहरातील शिवनेरी चौक, माणिक चौक, गांधी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, गजानन महाराज मंदिर परिसर, महात्मा फुले पतसंस्था, संविधान चौक, सावता चौक, तीन पुतळा परिसर, क्रांतीज्योती नगर तेलीपुरा सावित्रीबाई फुले चौक, फुले नगर, तेलीपुरा, गजानन महाराज मंदिर पश्चिम द्वार मार्गे विद्यालयात शोभायात्रेची सांगता झाली.
शोभायात्रेदरम्यान विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चौक-चौकांमध्ये समाज प्रबोधनपर पथनाट्य सादर केले. लेझीम पथकाने देखील लेझीम नृत्य सादर केले. अनेक विद्यार्थ्यांनी महापुरुषांची वेशभूषा करून झाकीमध्ये सहभाग घेतला. शोभायात्रेच्या मार्गावर शहरातील नागरिकांनी रांगोळी काढून, अभिवादन करून शोभायात्रेचे उत्साहात स्वागत केले.
विद्यार्थ्यांसाठी शहरातील महात्मा फुले पतसंस्था, क्रांतीसुर्य ग्रुप, निर्भया फाउंडेशन, मित्र गणेश उत्सव मंडळ, सावित्रीबाई पतसंस्था, जिजाऊ पतसंस्था यांच्या वतीने चहा, नाश्ता, बिस्किटे, शीतपेय, पेन आणि मिठाईचे वाटप करण्यात आले.

Previous articleराज्यस्तरीय अबॅकस स्पर्धा शेगाव येथे संपन्न,विविध जिल्ह्यातून शेकडो विद्यार्थ्यांचा सहभाग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here