Home महाराष्ट्र खामगाव–शेगाव मार्गावर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू, कारचालक फरार

खामगाव–शेगाव मार्गावर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू, कारचालक फरार

16
0

शेगाव, दि. २3 जून : खामगाव–शेगाव राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने दुचाकीला समोरासमोर धडक दिल्याने हा अपघात घडला. अपघातानंतर संबंधित कारचालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवशंकर तुळशीराम झाडे (वय ५३, रा. नवा अंदुरा, ता. बाळापूर, जि. अकोला) हे सोमवारी दुपारी आपल्या MH-30-N-9730 क्रमांकाच्या दुचाकीने शेगावहून खामगावकडे जात होते. दुपारी सुमारे १२.४५ वाजण्याच्या सुमारास माऊली वॉटर पार्क परिसरात समोरून येणाऱ्या MH-23-AS-0090 क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, धडकेचा आवाज दूरपर्यंत ऐकू गेला. अपघात इतका भीषण होता की दुचाकीचे मोठे नुकसान झाले. गंभीर जखमी झालेल्या शिवशंकर झाडे यांना वाचविण्याचे प्रयत्न करण्यात आले; मात्र त्यांचा मृत्यू झाला.

अपघातानंतर संबंधित कारचालकाने जखमी व्यक्तीला मदत न करता वाहनासह घटनास्थळावरून पलायन केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

या प्रकरणी मृत व्यक्तीचे पुतणे अनिकेत नागोराव झाडे (वय २९) यांनी शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अप. क्र. १८०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम २८१, १०६ (१) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १३४ व ३(१)/१८१ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेची प्राथमिक नोंद पोलीस हेडकॉन्स्टेबल अतुल आगलावे यांनी केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजानन पाटील यांच्या मार्गदर्शना

Previous articleप्रभाग क्र. 9 मधील पाणीटंचाई, रस्त्यांची दुरवस्था व ड्रेनेज कामांमुळे नागरिक त्रस्त; नगर परिषदेकडे निवेदन
Next articleउद्या कलमाच्या वारसांचा सन्मान: शेगावात गुणवंत पत्रकार पुत्रांचा सत्कार समारंभ !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here