
शेगाव, दि. 18 ऑगस्ट 2026 :
लोहमार्ग पोलीस ठाणे, शेगाव येथील पोलिसांनी तांत्रिक तपासाची प्रभावी अंमलबजावणी करत रेल्वे प्रवाशाचा चोरीस गेलेला मोबाईल शोधून काढत आरोपीस अटक केली आहे. आरोपीकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेला मोबाईल किंमत 59,999/- व इतर चोरीचे 06 मोबाईल किमंत 1,44,000/-असे एकूण 7 मोबाईल फोन, अंदाजे किंमत ₹2,03,999/- असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
नमूद गुन्ह्यातील फिर्यादी नामे अक्षय जितेंद्र मोरचुले, वय 31 वर्षे, रा. गोबरवाही, ता. तुमसर, जि. भंडारा हे दिनांक 19/07/2026 रोजी ट्रेन क्र. 12136 नागपूर–पुणे एक्स्प्रेसच्या कोच क्रमांक S-5, बर्थ क्र. 37 वरून नागपूर ते मनमाड चा प्रवास करत असताना रात्री 01.00 वाजताच्या सुमारास शेगाव ते मलकापूर दरम्यान त्यांच्या झोपेचा फायदा घेऊन कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचा Vivo कंपनीचा V40 Pro मोबाईल चोरून नेला . सदर मोबाईलची अंदाजे किंमत ₹59,999/- होती. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रार वरून लोहमार्ग पोलीस ठाणे, शेगाव येथे गुन्हा क्र. 130/2026, कलम 305(C) BNS 2023 अन्वये गुन्हा दाखल होता.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार रामकृष्ण खंडागळे यांच्याकडे देण्यात आला. तपासादरम्यान तांत्रिक पद्धतीचा वापर करून CEIR पोर्टलच्या माध्यमातून चोरीस गेलेल्या मोबाईलचा शोध घेण्यात आला. त्यानुसार आरोपी गजानन वसंता सुशिर, वय 32 वर्षे, रा. धरणगाव, ता. मलकापूर, जि. बुलढाणा याच्याबाबत महत्त्वाची माहिती प्राप्त झाली. सदर आरोपीताचा बरेच दिवसापासून शोध घेत असताना देखील तो मिळून येत नव्हता.दि. 17/08/2026 रोजी गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार जगदीश ठाकूर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी हा रेल्वे स्टेशन मलकापूर येथे रेल्वे प्रवासी गाड्यावर चोरी करण्याकरता आला असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यांनी लगेच त्या ठिकाणी सापळा रचून त्यास मलकापूर रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेतले . आरोपीची चौकशी केली असता त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला. आरोपीस विश्वासात घेऊन आणखी विचारपूस केली असता त्यांनी रेल्वे प्रवासी गाड्यावर यापूर्वी चोरी केलेली मोबाईल त्याच्या राहते घरी ठेवले असल्याचे सांगितल्याने लागलीच तपास पथक तयार करून त्याच्या घरामधून गुन्ह्यातील मोबाईल व्यतिरिक्त आणखी 06 मोबाईल फोन मिळून आले. अशाप्रकारे आरोपीकडून गुन्ह्यातील चोरीचा मोबाईल व इतर चोरीचे मोबाईल असे एकूण 7 मोबाईल फोन, एकूण अंदाजे किंमत ₹ 2,03,999/- असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जप्त मुद्देमाल
Apple iPhone – ₹69,000/-
Redmi मोबाईल – ₹18,000/-
Vivo Y19 5G – ₹15,000/-
Moto G45 5G – ₹12,000/-
OPPO A79 5G – ₹20000/-
Lava Bold N1 – ₹10000/-
एकूण रिकव्हरी – ₹1,44,000/-
गुन्ह्यातील चोरी गेलेला मोबाईल Vivo 40 Pro मोबाईल किंमत 59999-/- असा एकूण 02,03,999/- Rs चा माल
आरोपीकडून मिळून आलेल्या इतर मोबाईल फोनच्या मूळ गुन्ह्यांबाबत तसेच त्याने आणखी काही चोरीचे गुन्हे केले आहेत का, याबाबत पुढील तपास केला असता रेल्वे पोलीस ठाणे शेगाव येथील खालील प्रमाणे उघड झालेले आहेत
1) RPS Shegaon CR No 57/2026 U/S 305(C) BNS
2)RPS Shegaon CR No 126/2026 U/S 305(C) BNS
3) RPS Shegaon CR No 145/2026 U/S 305(C) BNS
उल्लेखनीय कामगिरी-
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप पालवे, लोहमार्ग, छत्रपती संभाजीनगर तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. वसंत भोये यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी श्री. विवेकानंद राळेभात, पोलीस हवालदार रामकृष्ण खंडागळे, पोलीस हवालदार/265 जगदीश ठाकूर,पोलिस हवालदार/379 राम मोहेकर, पोलीस शिपाई/305 ऋषिकेश जवळकर यांनी केली आहे.



