Home महाराष्ट्र लोहमार्ग पोलीस शेगावची उत्कृष्ट कामगिरी; चोरीस गेलेला मोबाईल हस्तगत करून आरोपीला अटक

लोहमार्ग पोलीस शेगावची उत्कृष्ट कामगिरी; चोरीस गेलेला मोबाईल हस्तगत करून आरोपीला अटक

9
0

शेगाव 28 जुलै – रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी व त्यांच्या मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी लोहमार्ग पोलीस सातत्याने दक्ष असून, रेल्वे पोलीस ठाणे शेगाव यांनी चोरीच्या गुन्ह्याचा यशस्वी उलगडा करत चोरीस गेलेला मोबाईल हस्तगत करून आरोपीला अटक करण्यात यश मिळविले आहे.

फिर्यादी अंजना छत्रदास मिरी, वय 25 वर्षे, रा. मंगला, जि. बिलासपूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्या दिनांक 25/06/2026 रोजी ट्रेन क्र. 12129 आझाद हिंद एक्सप्रेसच्या एस-2 (S-2) कोचमधून मनमाड ते बिलासपूर असा प्रवास करीत असताना, फिर्यादी यांना झोप लागली असता झोपेचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने त्यांचा रियलमी कंपनीचा C55 मॉडेलचा मोबाईल, किंमत ₹13,999/-, रेल्वे स्टेशन शेगाव येणेपूर्वी चोरी करून नेला होता.

याप्रकरणी रेल्वे पोलीस ठाणे शेगाव येथे गुरन क्र. 108/2026 कलम 305(C) भारतीय न्याय संहिता प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रामकृष्ण खंडागळे यांच्याकडे सोपविण्यात आला.

तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषण, सीईआयआर (CEIR) प्रणाली, गोपनीय माहिती व कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारे चोरीस गेलेल्या मोबाईलचा शोध घेण्यात आला. तपासात नथुलाल सवाजी मीना, वय 32 वर्षे, रा. केनार, पोस्ट धोलगीर, खेडा, ता. सलुमबर, जि. उदयपूर (राजस्थान), सध्या रा. महावीर भोजनालय, गोल्डन पॅलेस बिल्डिंग, रेल्वे स्टेशन चौक, अकोला, जि. अकोला याने सदर मोबाईल चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आरोपीस अटक करण्यात आली असून त्याच्याकडून चोरीस गेलेला मोबाईल जप्त करण्यात आला आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक, लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर श्री. संदीप पालवे, उपविभागीय पोलीस अधिकारी, लोहमार्ग मनमाड श्री. वसंत भोये यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रभारी अधिकारी सहा.पोलीस निरीक्षक श्री. विवेकानंद राळेभात यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल रामकृष्ण खंडागळे यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

यावेळी प्रभारी अधिकारी सहा.पोलीस निरीक्षक श्री. विवेकानंद राळेभात यांनी रेल्वे प्रवाशांना आवाहन केले की, प्रवासादरम्यान आपल्या मौल्यवान वस्तू, मोबाईल, दागिने व सामान यांची विशेष काळजी घ्यावी. झोपेत किंवा गर्दीच्या ठिकाणी आपले साहित्य असुरक्षित ठेवू नये. कोणतीही संशयास्पद व्यक्ती अथवा घटना निदर्शनास आल्यास तात्काळ जवळच्या रेल्वे पोलीस ठाण्यास संपर्क साधावा. लोहमार्ग पोलीस प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर व कटिबद्ध आहेत.

Previous articleरेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे जलंब रेल्वे स्थानकावर महिलेचा जीव वाचला; बिहारमधील कुटुंबीयांचा शोध घेऊन सुरक्षित निवारा उपलब्ध
Next articleनांदुरा रेल्वे स्थानकावरून बेपत्ता झालेल्या गर्भवती महिलेचा तांत्रिक तपासाच्या आधारे शोध; लोहमार्ग पोलिसांनी सुखरूप पालकांच्या ताब्यात केले सुपूर्द

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here