Home महाराष्ट्र दलित वस्ती सुधारणा योजनेचा निधी तात्काळ खर्च करा — रामा पाटील थारकर

दलित वस्ती सुधारणा योजनेचा निधी तात्काळ खर्च करा — रामा पाटील थारकर

9
0

शेगाव / प्रतिनिधी
तालुक्यातील ग्रामीण भागासाठी आर्थिक वर्ष २०२६–२७ अंतर्गत मंजूर झालेला दलित वस्ती सुधारणा योजनेचा निधी तात्काळ खर्च करून विकासकामे सुरू करावीत, अशी मागणी शिवसेनेचे तालुकाप्रमुख रामा पाटील थारकर यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती शेगाव यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, अनेक ग्रामपंचायतींमध्ये दलित वस्ती सुधारणा योजनेचा निधी मंजूर होऊनही विविध प्रशासकीय कारणांमुळे तो खर्च करण्यात आलेला नाही. परिणामी दलित वस्त्यांमधील नागरिकांना मूलभूत सुविधा वेळेत उपलब्ध होत नसून विकासकामेही रखडली आहेत.
तसेच ग्रामपंचायत सचिव व गटविकास अधिकाऱ्यांच्या संयुक्त स्वाक्षरी संदर्भातील तांत्रिक अडचणी दूर करून ऑनलाइन अथवा ऑफलाइन निविदा प्रक्रियेसाठी आवश्यक सूचना व मार्गदर्शन तातडीने देण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
मंजूर झालेला निधी त्वरित खर्च करून विकासकामे विहित मुदतीत पूर्ण करण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींना आवश्यक निर्देश द्यावेत, तसेच निधी खर्चाचा नियमित आढावा घेऊन कोणत्याही प्रकारचा विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी मागणी थारकर यांनी केली आहे.
या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.

Previous articleनांदुरा रेल्वे स्थानकावरून बेपत्ता झालेल्या गर्भवती महिलेचा तांत्रिक तपासाच्या आधारे शोध; लोहमार्ग पोलिसांनी सुखरूप पालकांच्या ताब्यात केले सुपूर्द
Next articleशेगावात बालकामगारांविरोधात पोलिसांचा दणका! वेल्डिंग वर्कशॉप मालकावर गुन्हा दाखल; १६ वर्षीय दोन मुलांना कामाला लावल्याचे उघड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here